Saturday, 31 March 2018

मला ब्रेकअप करायचंय !

होय ! मला ब्रेकअप करायचंय !
कंटाळा आलाय मला रोज रोज माझ्या प्रेमाशी भांडून .......
त्या प्रेमाला खुश ठेवण्यासाठी त्याच्याशी होणार्या भांडणानशी .....
मला ब्रेकअप करायचंय !
रोज रोजच्या आमच्या एकमेकांवरच्या रुसव्यामुळे.............
दोघेही गमावणाऱ्या प्रेमाच्या क्षणांसाठी ............
रोजरोजच्या रुसव्या सोबत .........
मला ब्रेकअप करायचंय !
प्रत्येक वेळी तो मला मिठीत घेतो पण,
 भांडल्यानंतर त्याची पकड आणखीन घट्ट होते.........
बिना भांडता त्याची पकड मला आणखीन घट्ट करायची आहे......
आणि म्हणूनच त्याच्या माझ्या भांडणानशी.......
मला ब्रेकअप करायचंय !
त्याच्यासोबत मला सुखी संसाराचं स्वप्न प्रत्यक्षात थाटायचंयं.......
लेकरांच्या आयुष्याची शिदोरी जमवताना त्याच्या कष्टाला हातभार लावायचाय ...........
स्वतःची स्वप्न पूर्ण करता करता त्याच्या स्वप्नानाही वाव द्यायचाय.............
सुखी आयुष्यात अचानक येणाऱ्या अश्रूंचा पाट मला पुसून काढायचाय........
आणि आमच्या सुखी संसारात येणाऱ्या प्रत्येक दुखाच्या वादळासोबत .........
मला ब्रेकअप करायचंय !
मला ब्रेकअप करायचंय !

AATHVAN

अलगद मनात ठेवलेल्या पिंपळ पानाला

आठवणींच्या हिंदोळ्यात झुले बालपणीची रम्य आठवण

शाळेच्या आठवणींची रम्य साठवण....



रावी आणि राघव दोघही लहानपणापासून एकत्र राहिलेली वाढलेली एकमेकांना हक्काने साद घालणारे ... आवडी निवडी जपणारे प्रत्येक गोष्टीत एकमेकांची मदत करणारे.... सातवीच शाळेचं शेवटचं वर्ष कारण आमची शाळा हि फक्त सातव्या एयत्तेपर्यंतच मर्यादित होती....

आज शाळेचा शेवटचा दिवस .... उद्यापासून सगळे वेगळे होणार.. या जाणिवेनेच प्रत्येकाचे डोळे भरून येत होते... आणि या दोघांच्याही मनात एक अनामिक हुरहूर दाटून आली होती कारण सात वर्षांपासून चालत आलेली मैत्री आज प्रेमात बदलणार होती.. कार्यक्रम संपला जेवण झालं सगळे विद्यार्थी मजा मस्ती करू लागले... खेळ खेळता खेळता अचानक तो उठून उभा राहिला अगदी फिल्मी styl मध्ये हातात गुलाबाचे फुल धरून “लहानपणीच्या मैत्रीला साद प्रेमाची देशील का सांग सांग सखे तू माझी होशील का”? अशा छानशा दोन ओळी म्हणून आपल्या मनातले प्रेम सर्व वर्गमित्रांसमोर त्याने व्यक्त केले आणि तिने सुद्धा हसत हसत त्याच्या या प्रेमळ साथीला होकार दिला... आणि सर्वांनी एकाच जल्लोष केला.....

असेच दिवस जात होते.. आठवी नववी आणि मग आले दहावीचे वर्ष आयुष्यात नवीन वळण आणणारं ... आता अभ्यासाला जास्त जोर चढला भेटणं कमी झालं पण प्रेम मात्र वाढतच राहिल.... वेळ निघत गेली परीक्षा आली आणि गेली... सर्वांचे पेपर्स आणि निकाल उत्तम आले सगळे खुश झाले.... एका मस्त कॉलेज मध्ये दोघांनी सुद्धा प्रवेश घेतला.. सर्व काही खूप छान चालले होते..

फेब्रुवारी महिन्यात अकरावीची फायनल एक्झाम होणार असं एक महिन्या आधीच डिक्लेअर करण्यात आलं त्यातच या दोघांनी एक निर्णय घेतला कि दोघांच्याही घरी यांच्याबद्दल सांगायचं... त्याने आधी त्याच्या घरी सांगितलं त्याच्या घरी हीच येणंजाण असल्यामुळे त्याच्या घरी हे मंजूर सुद्धा झालं.. तारीख ठरली तिने तिच्या ताईला तिच्या वाढदिवशी हे सांगायचं असं ठरलं पण त्याच्या एक दिवस आधी पूर्ण ग्रुप ने फिरायला जायचं ठरवलं आणि ठरवल्याप्रमाणे सगळेजण आपापल्या गाड्या घेऊन सकाळी सकाळी कॉलेज च्या बाहेर भेटले.. दिवस भर सर्वांनी खूप एन्जॉय केला मज्जा केली.... आणि दुपारी दोन च्या सुमारास सर्वांनाच जाम भूक लागली... तो आणि त्याचा एक मित्र जवळपास काही खायला मिळतंय का हे बघता बघता मेन रोड ला जाऊन पोचले तिथे त्यांना fast food भेटलं ते घेऊन दोघं पण निघाली आणि इथेच काळाने आपलं निर्दयी घाव त्या तरुण मुलाचा हृदयात घातला एका भरधाव ट्रकने त्यांच्या गाडीला उडवलं .. आणि तो तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडला बराच वेळ झाला हि दोघ सुद्धा आली नाहीत म्हणून सर्व मंडळी त्या दोघांना शोधायला निघाली आणि शोधता शोधता मेन रोड ला येऊन पोहोचली इकडे तिकडे बघताना तिला तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं दिसला त्या पोरीने तिकडेच जोराचा हंबरडा फोडला त्या निष्पाप प्रेमाला कवेत घेऊन ती रडू लागली शोक करू लागली पण त्याचं तिच्यावर स्वतःपेक्षा सुद्धा जास्त प्रेम होतं .. मरणाच्या दारात उभा असतांना देखील ए वेडू तू रडू नको ना प्लीज नाहीतर मला खूप त्रास होईल गं... तू स्वतःची काळजी घे आणि नेहमी खुश रहा गं.. मला एवढंच हवाय तुझ्याकडून देशील ना??? आणि त्याने तिथेच तिच्या मांडीवर जीव सोडला आजही हि त्याच्या आठवणीत हळहळते आहे... थोडीशी पुढे निश्चितच गेली आहे ती परंतु आजही ती त्याच्या आठवणीत स्वतःचे सुख मानते आहे..... एवढं सगळं होऊन सुद्धा काहीच झाले नाही असं दाखवते आहे... जुन्या आठवणी काढून मनातल्या मनात कुडते आहे...

आजही ती हसून हसून फक्त रडते आहे ... फक्त रडते आहे